पुर्णा हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र - रामदास आठवले
परभणी, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। पुर्णा शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. बुधवारी (दि.19) पुर्णा येथील दिवंगत पॕथर बी.एन.लोखंडे व दिवंगत पॕथर दिलीप आठवले यांचे निधन झाल्याने त्या
Q


परभणी, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। पुर्णा शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. बुधवारी (दि.19) पुर्णा येथील दिवंगत पॕथर बी.एन.लोखंडे व दिवंगत पॕथर दिलीप आठवले यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आठवले डॉ. आंबेडकर नगर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.

आठवले पुढे म्हणाले की, दलित पॕथर स्थापनेपासून चळवळीच्या काळापासून पुर्णा येथील कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण आज दिल्लीपर्यंत पोचलो असल्याचे सांगुन रिपाइंची चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन आठवले यांनी केले. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी तालुक्यातील गौर येथील दिवंगत संतोष सावळे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंते पय्यावंश, रिपाइं नेते डी.एन.दाभाडे, शहराध्यक्ष अॕड.विजय भवरे, भंते पय्यासार, भगवान कांबळे, अशोक धबाले, भिमा मल्हारे, पांडुरंग अहिरे, ॲड.अमोल भवरे, राहुल भवरे, अतूल गवळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande