
नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)कॅमेरा हातात असला की जगाकडे पाहण्याची दृष्टी थोडी वेगळीच होते. प्रत्येक चेहऱ्यात एक कथा, प्रत्येक क्षणात एक आठवण आणि प्रत्येक फ्रेममध्ये जपून ठेवावी अशी एक भावना दिसू लागते. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी छायाचित्रकारांचे कौतुक केले.
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त खासदार अशोक चव्हाण यांनी कॅमेरा आपल्या हाती घेतला त्यावेळी छायाचित्रकारांना ते म्हणाले,मनाला आनंद देणारी छायाचित्रणाची आवड केवळ माझ्याच नव्हे, तर प्रत्येकाच्याच मनात कुठे ना कुठे नक्कीच असते. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सर्व छायाचित्रकार आणि छायाचित्रप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis