
नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला आहे. येथील पेठ तालुक्यात भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिकच्या पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्याने काही नागरिकांची एकच पळपळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भागात बुधवारी सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
सकाळच्या सुमारास अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये तीव्र घबराट पसरली. जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे जाणवल्याचे समोर आलं आहे. मागील महिनभरात 5 ते 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI