बीड : महिलांविषयीच्या वक्तव्याने संताप; नवनाथ वाघमारेंवर कारवाईची मागणी
बीड, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठा समाजातील मुली व महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात परळीत संताप व्यक्त होत आहे. संबंधित वक्तव्याची गंभीर दखल घेत सकल मराठा समाजाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात
कारवाईची मागणी


बीड, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठा समाजातील मुली व महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात परळीत संताप व्यक्त होत आहे. संबंधित वक्तव्याची गंभीर दखल घेत सकल मराठा समाजाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

महिलांचा अवमान करणारी तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकणारी वक्तव्ये सामाजिक शांततेसाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी; अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने, शिवाजी देशमुख, ऍड.अर्जुन सोळंके, बाबासाहेब शिंदे आदीसह मराठा व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande