जुन्नर - पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपळवंडी येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी
gfd


पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

पिंपळवंडी येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी (दि. १९) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गावातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत सकाळी सुमारे दहा वाजता महामार्गावर आंदोलन सुरू केले. ‘आमच्या मुलीला न्याय द्या’, ‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या’, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी सुमारे दीड ते दोन तास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

यावेळी संगमनेर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, माजी पंचायत समिती सभापती संगीता वाघ, मेघा काकडे, सुप्रिया लेंडे, मोनाली खोंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande