परभणीत छायाचित्रकारांचा गौरव; मराठवाडा हायस्कूलमध्ये 'जागतिक छायाचित्र दिन' साजरा
परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी येथील स्थानिक मराठवाडा हायस्कूलमध्ये बुधवारी(दि. १९) ''जागतिक छायाचित्र दिन'' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परभणी जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा शालेच्या
Q


परभणी, 19 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी येथील स्थानिक मराठवाडा हायस्कूलमध्ये बुधवारी(दि. १९) 'जागतिक छायाचित्र दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परभणी जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा शालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे सहसचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक अनंत पांडे हे होते. यावेळी छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर, योगेश गौतम, रवी सोमवंशी, श्रीकृष्ण इनामदार, अमोल लंगर, शंकर झटे आणि रवी यन्नावार आदींचा सत्कार करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ छायाचित्रकारांनी, छायाचित्रण ही केवळ एक कला नसून तो इतिहास जिवंत ठेवण्याचा एक सशक्त मार्ग आहे, असे सांगत आपल्या प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे कौतुक केले. आधुनिक काळात छायाचित्रण हे करिअरचे एक उत्तम माध्यम कसे बनू शकते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शिक्षण तज्ञ महेश पाटील, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील व सहपरिवेक्षक सुनील रामपूरकर, विश्वास दिवाळकर, गोपाळ रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande