लातूरातआरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : रंगरूट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), लातूर येथे आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्षा बसमी शौकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. अधिकार
वृक्षारोपण


लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

: रंगरूट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), लातूर येथे आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्षा बसमी शौकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. अधिकारी व जवानांच्या कुटुंबातील महिलांनीही वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

आरटीसी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण, हरित क्षेत्राचा विस्तार तसेच वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी बसमी शौकत यांनी ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. लागवड केलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले.

वृक्षारोपणाचा हा उपक्रम उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande