
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत असतानाच सोलापूर मंडळातील ८ लाख १६ हजार ग्राहकांपैकी ४ लाख ४४ हजार ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक असून, ३ लाख ७९ हजार घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
सोलापूर मंडळात वाणिज्यिक वर्गवारीतील ३६ हजार, औद्योगिक वर्गवारीतील १४ हजार ९२७ आणि अन्य वर्गवारीतील १४ हजार ग्राहकांच्या वीज जोडण्यांवरही स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
सातारा मंडळातील ८ लाख ९० हजार ग्राहकांपैकी ३ लाख ५० हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये २ लाख ९७ हजार घरगुती, २९ हजार वाणिज्यिक आणि ८ हजार ४९१ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
दरम्यान, बारामती ग्रामीण मंडळातील ५ लाख १२ हजार ग्राहकांपैकी २ लाख ३८ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये १ लाख ९५ हजार घरगुती, २५ हजार वाणिज्यिक आणि ६ हजार ८५५ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
बारामती परिमंडळातील एकूण २२ लाख १९ हजार ग्राहकांपैकी १० लाख ३२ हजार ग्राहकांच्या वीज जोडण्यांवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या ८ लाख ७२ हजार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड