सोलापूर पोलिसांचा दणका; १७ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। मालमत्तेविषयक गुन्हे, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या करमाळा व माढा तालुक्यातील १७ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी या गुन्हेगारांवि
SP


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

मालमत्तेविषयक गुन्हे, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या करमाळा व माढा तालुक्यातील १७ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी या गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डूवाडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या १७ जणांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले.

या कारवाईनुसार संबंधित १७ गुन्हेगारांना सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासह निश्चित करण्यात आलेल्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये करमाळा, माढा, टेंभुर्णी आणि कुर्डूवाडी परिसरातील आरोपींचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक रणजित माने, अतुल मोहिते आणि बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्वाखाली तडीपारीची प्रक्रिया राबविण्यात आली.

वाळू तस्करी, अवैध व्यवसाय तसेच शरीर आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande