सौर ऊर्जेमुळे शेतीपंपांना दिवसा वीज; सिंचनाचे नियोजन सुलभ
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सौर कृषी ऊर्जेच्या माध्यमातून बारामती परिमंडळातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असून, ५८ हजार ६
solar


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

सौर कृषी ऊर्जेच्या माध्यमातून बारामती परिमंडळातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असून, ५८ हजार ६८४ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांद्वारे दिवसा मोफत वीज उपलब्ध झाली आहे.

कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारून कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात होता. रात्रीच्या वेळी शेतीपंप चालविताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिवसा वीजपुरवठ्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

सातारा मंडळात ८६१ एकर क्षेत्रावर १७५ मेगावॅट क्षमतेचे ४२ सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातून ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. तर बारामती ग्रामीण मंडळात ४४० एकर क्षेत्रावर १११ मेगावॅट क्षमतेचे २२ प्रकल्प उभारण्यात आले असून, ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.

दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सुलभपणे करता येत असून, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची, श्रमाची आणि सुरक्षिततेची बचत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande