
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरालगत भांगसी माता गडाच्या पायथ्याशी झालेल्या ‘महामहिम राज्यपाल केसरी’ बैलगाडा शर्यतीचा अंतिम थरार रंगला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या बैलगाडा मालक आणि हजारो शौकिनांच्या उपस्थितीत ही स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल ५६० बैलगाड्यांची नोंदणी झाली होती. ५६ गटांमध्ये ६७ फेऱ्या पार पडल्यानंतर सेमीफायनलमधील ११ गटांतून अंतिम फेरीसाठी बैलगाड्या पात्र ठरल्या. अंतिम फेरीत वेग आणि ताकदीची चुरस पाहायला मिळाली. यात ‘सम्राट-शंकर’ या बैलजोडीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. शर्यतीचा थरार ड्रोन कॅमेऱ्यातही कैद करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis