पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. हेमंतकुमार साका यांची एकमताने निवड
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पद्मशाली युवक संघटना सोलापूरच्या वर्ष २०२६–२०२७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. हेमंतकुमार आनंद साका यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यासोबतच प्रेसिडेंटपदी आ
Hjk


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पद्मशाली युवक संघटना सोलापूरच्या वर्ष २०२६–२०२७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. हेमंतकुमार आनंद साका यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यासोबतच प्रेसिडेंटपदी आशुतोष उर्फ मिकी रामकृष्ण दंडी तर सचिवपदी नागेश विजय म्याकल यांची निवड झाली. पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे विश्वस्त मंडळ आणि उपस्थित बहुसंख्य समाजबांधवांच्या संमतीने ही निवड प्रक्रिया पार पडली.

१३ वर्षांचा विधी क्षेत्रातील दांडगा अनुभव

नूतन अध्यक्ष ॲड. हेमंतकुमार साका हे गेल्या १३ वर्षांपासून सोलापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून फौजदारी कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील अन्यायग्रस्त, गरजू आणि पीडित व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत देण्याचे सामाजिक कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या विधी क्षेत्रातील ज्ञानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा फायदा युवक संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

ॲड. साका यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली युवकांना संघटित करून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व कायदेविषयक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. युवकांनी आपल्या संस्कृतीशी व परंपरांशी जोडलेले राहून आधुनिक शिक्षण, सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवेच्या माध्यमातून प्रगती साधावी, यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या समाजोपयोगी कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande