पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; पुणे नाका ते तुळजापूर नाका मार्गावर एकेरी वाहतूक
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। डी मार्टसमोरील उड्डाणपुलावर दुरुस्ती व रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. कामाच्या पार्श्वभूमीवर पुणे नाका ते तुळजापूर नाका या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आ
Vh


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। डी मार्टसमोरील उड्डाणपुलावर दुरुस्ती व रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. कामाच्या पार्श्वभूमीवर पुणे नाका ते तुळजापूर नाका या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

एकेरी वाहतुकीमुळे या मार्गावर वाहनांचा ताण वाढला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी, परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande