उत्पन्न वाढवण्यासाठी सोलापूर पालिकेची शहरातील मोक्याची जागा भाड्याने देण्याच्या निर्णयाचा निषेध
सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या सात जागा बीओटी (BOT) तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या निर्णयाला तीव्र विरोध करून चार हुतात्मा पुतळ्यासमोर महानगरपालिका भाड
Jsjs


सोलापूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या सात जागा बीओटी (BOT) तत्त्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या निर्णयाला तीव्र विरोध करून चार हुतात्मा पुतळ्यासमोर महानगरपालिका भाड्याने देणार आहेत का? असा बॅनर लावून महानगरपालिका महापौर व सर्व पदाधिकारी यांनी सोलापूर महानगरपालिकेची उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागा भाड्याने देण्याच्या निर्णयचा तीव्र निषेध केला आहे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या महत्त्वाच्या जागा दीर्घकाळासाठी खासगी विकासकांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या जागांचा उपयोग महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. “सोलापूरचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली मोक्याच्या जागा बीओटीवर देणार असाल, तर उद्या सोलापूर महानगरपालिकाच भाड्याने देणार का?” असा थेट सवाल संभाजी ब्रिगेडने महानगरपालिका प्रशासनाला केला आहे.

जर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या हेतू सोलापूर महापालिका चे उत्पन्न वाढीसाठी असेल तर सर्वात प्रथम त्यांनी महानगर पालिकेच्या गाड्या कार्पोरेट ऑफिस, मानधन व इतर सुख सोयीचा त्याग करावा. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले सचिव रमेश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद नागोरे शहर उपाध्यक्ष प्रशांत देशमुख उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे रामेश्वर सोडके आधी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande