लातूरमध्ये दुसऱ्या दिवशीही मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच
लातूर, १९ ऑगस्ट (हिं.स.)। महानगरपालिका अधिकाऱ्यांशी गैरवर्तन तसेच अतिरिक्त आयुक्तांशी असभ्य वर्तन केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे महानगरप
मनपा


लातूर, १९ ऑगस्ट (हिं.स.)। महानगरपालिका अधिकाऱ्यांशी गैरवर्तन तसेच अतिरिक्त आयुक्तांशी असभ्य वर्तन केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी, अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरच कामबंद आंदोलन मागे घेतले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, चर्चेतून काय निष्कर्ष निघतो याकडे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande