
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगरातील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. तपासणीत सिगारेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची एकत्रित साठवणूक, शीतसाखळीचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आली. गोदामात तंबाखूच्या पिचकाऱ्या, तुटलेल्या फरशा, उंदरांचा धोका, शीतगृहाच्या तापमान नोंदींचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याचा अहवाल उपलब्ध नसल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे नसून ॲप्रन, ग्लोव्हज आणि हेड कॅपचाही वापर होत नसल्याचे आढळले. अन्न खरेदीची बिले आणि आवश्यक पुरवठा कागदपत्रेही उपलब्ध नव्हती. या गंभीर त्रुटींमुळे सहायक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी ब्लिंक कॉमर्सचा FSSAI अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला. निलंबनाच्या काळात संबंधित ठिकाणाहून अन्नाची खरेदी, विक्री, साठवणूक आणि ऑनलाइन डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis