पैठण व पाचोड येथील रुग्णालयांच्या कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक !
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पैठण व पाचोड येथील रुग्णालयांच्या कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली आमदार विलास भुमरे यावेळी उपस्थित होते. मुंबई मंत्रालय येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथील १०० खा
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

पैठण व पाचोड येथील रुग्णालयांच्या कामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली आमदार विलास भुमरे यावेळी उपस्थित होते.

मुंबई मंत्रालय येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड, ता.पैठण येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत दोन्ही रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेत प्रशासकीय व तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पैठण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार, सुसज्ज आणि सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांच्या कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ठोस पावले उचलण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande