छायाचित्रकार संघटना परळीच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। परळीतील छायाचित्रकार संघटनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी 9 वा. सर्व छायाचित्रकार यांनी जिजामाता उद्यानात एकत्र येऊन महाराष्ट्राचा मानाचा भगवा फेटा बांधून घेतला व सर्वांनी माता जिजाऊ यांच्या पुत
छायाचित्र दिन


बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। परळीतील छायाचित्रकार संघटनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी 9 वा. सर्व छायाचित्रकार यांनी जिजामाता उद्यानात एकत्र येऊन महाराष्ट्राचा मानाचा भगवा फेटा बांधून घेतला व सर्वांनी माता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयघोष केला उद्यानातील शंकर भगवान मूर्ती जवळ फोटोसेशन करून मोटार सायकल रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज आण्णाभाऊ साठे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज या महामानवांना पुष्पहार अर्पण करून रॅलीने सुयोग फोटो वर्ल्ड येथे कार्यक्रम स्थळी एकत्र आले.

या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रवी वळसे यांच्या अध्यक्षतेत गटनेते न.प. वैजनाथराव सोळुंके शिक्षण सभापती योगेश जी मेनकुदळे, ह .भ .प. कोकाटे महाराज या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande