
छत्रपती संभाजीनगर, १९ ऑगस्ट (हिं.स.)। भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संतोष दानवे यांनी महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, ग्रामीण रस्त्यांची कामे तसेच विविध प्रलंबित जनहिताच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यावरही यावेळी चर्चा झाली.
भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी यावेळी सांगितले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis