
नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी मतदारसंघातील विविध नवीन विकासकामांच्या मागण्यांचे निवेदनही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले.
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्या आमदार चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. याप्रसंगी पुणे येथील डॉ. सुभान शेख उपस्थित होते. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
भेटीदरम्यान मांडलेल्या विविध विषयांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिले. त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांना आगामी काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis