अमेरिकेतील अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळले; दोन वैमानिकांसह आठ जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन, 21 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या अलास्का राज्यात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. पश्चिम अलास्कात एक चार्टर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून, त्यातील दोन वैमानिकांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी लष्कराने विमानातील सर्व आठ जणांचा मृत्य
अमेरिकेतील अलास्कामध्ये चार्टर विमान कोसळले; दोन वैमानिकांसह आठ जणांचा मृत्यू


वॉशिंग्टन, 21 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेच्या अलास्का राज्यात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. पश्चिम अलास्कात एक चार्टर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून, त्यातील दोन वैमानिकांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी लष्कराने विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

एका संघीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर हे विमान पश्चिम अलास्कातील दुर्गम भागात रडारवरून गायब झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार्टर विमानाने अँकरेज परिसरातून उड्डाण केले होते आणि गुरुवारी दुपारी केप न्यूएनहॅम परिसरात ते रडारवरून गायब झाले.

यानंतर मदत आणि बचाव पथकांनी विमानाचा शोध सुरू केला. आता अमेरिकी लष्कराने विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची पुष्टी केली असून, विमानातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अमेरिकी लष्कराने निवेदन जारी करून मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande