श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा
परभणी, 22 ऑगस्ट (हिं.स.)। येथील श्री शिवाजी विधी महाविद्यालयाच्या २८ व्या दीक्षांत पदवी वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. २२)करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या एकूण ८९ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. यावे
श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा


परभणी, 22 ऑगस्ट (हिं.स.)। येथील श्री शिवाजी विधी महाविद्यालयाच्या २८ व्या दीक्षांत पदवी वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. २२)करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या एकूण ८९ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम. सादराणी होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. एल. धर्मापुरीकर हे होते. महाविद्यालय विकास समिती सदस्य चंद्रशेखर नखाते, नारायण चौधरी, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. वसीम आय. खान उपस्थित होते.

आर.एस.सादराणी यांनी आपल्या बीज भाषणात, कठोर परिश्रमाने साध्य कराव्यात असे सांगितले. कायद्याचे जानकार म्हणून त्यांनी मूल्याधिष्ठित व्यक्ती बनून समाज निसर्ग, आपले शिक्षक वृंद व पालक यांच्या प्रति कृतज्ञ राहून आपले कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.एम. एल. धर्मापुरीकर यांनी केला. डॉ. वसीम आय. खान यांनी प्रास्ताविक, तर गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयका प्रा.डॉ.हर्षा सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता महाविद्यालयाने गठित केलेल्या विविध समित्याद्वारे महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande