हलगर्जीपणावर थेट कारवाईचा बडगा; आरोग्यमंत्र्यांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
आरोग्यमंत्र्यांचा धुळे आणि नाशिक जिल्हा दौरा नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)। - राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर नाशिक दौऱ्यावरती असताना विविध कामांमध्ये हलगर्जीपणा करणे आणि विविध कारणांमुळे कारवाईची निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे यामुळे नाशिक
Direct action against negligence


आरोग्यमंत्र्यांचा धुळे आणि नाशिक जिल्हा दौरा

नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

- राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर नाशिक दौऱ्यावरती असताना विविध कामांमध्ये हलगर्जीपणा करणे आणि विविध कारणांमुळे कारवाईची निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे यामुळे नाशिक धुळे मालेगाव व नाशिक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध शासकीय रुग्णालये, सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक व सविस्तर भेटी देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयांतील अस्वच्छता, रुग्णांची होणारी हेळसांड, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या (MJPJAY) अंमलबजावणीतील त्रुटी, प्रशासकीय ढिसाळपणा आणि जन कल्याण समित्यांच्या कामकाजातील त्रुटी समोर आले. सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि रुग्णसेवेत कसूर करणाऱ्या कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा देत आरोग्यमंत्र्यांनी संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दौऱ्यादरम्यान दिलेले प्रमुख निर्देश व कारवाईचा तपशील: सिव्हिल सर्जन (धुळे): रुग्णालयातील अस्वच्छ कारभार, कॅथलॅबचे काम असमाधानकारक व संथ गतीने असणे, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या (MJPJAY) कामकाज संदर्भात अंमलबजावणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय (मालेगाव): रुग्णालयातील अस्वच्छता आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची होणारी हेळसांड व गैरसोयीची गंभीर दखल घेत तात्काळ जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपुर . वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयीन कामकाजाकडे सततचे दुर्लक्ष, MJPJAY योजनेतील अत्यंत निकृष्ट कामगिरी आणि रुग्ण कल्याण आरोग्य समितीच्या सदस्यांशी समन्वयाचा अभाव असल्याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले.

तसेच नाशिक जिल्ह्यातील जायखेडा वैद्यकीय अधिकारी निताने उपकेंद्र व THO : जन आरोग्य समितीच्या सदस्यांना कामाची, अधिकारांची व बैठकांची कोणतीही माहिती न देणे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणे आणि बैठकांचा अभाव असणे यावर कारवाईचे निर्देश दिले. तसेच जन आरोग्य समितीच्या बैठका प्रत्यक्षात पार पडल्या आहेत का, याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि त्यानंतर पुढील कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी सुरगाणा परिसरातील बोगस डॉक्टरांवर ठोस कारवाई न करणे, बोगस डॉक्टरांची अचूक माहिती सादर करण्यात आलेले अपयश आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रशासकीय सहनियंत्रण ठेवण्यात आलेल्या असमर्थतेमुळे संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालय (भोजन कंत्राटदार): रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना निकृष्ट व अस्वच्छ दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, संबंधित भोजन कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. सुरगाणा तालुक्यातील पांगरणे प्राथमिक आरोग्य केंद्र , येथे कर्तव्यात कसूर करणे, कामातील अनियमितता आणि रुग्णसेवेतील हलगर्जीपणाप्रकरणी त्यांच्यावर त्वरित प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले झिरवाळ यांच्या मतदारसंघातील दिंडोरी येथील वरखेडा आणि तळेगाव वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाच्या मृत्यू संदर्भात हलगर्जीपणा आणि सखोल चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक जन कल्याण समिती अंमलबजावणीतील अनियमितता आणि बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार न करणे, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये औषधे आणि प्रयोगशाळा चाचण्यांबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयातील . वैद्यकीय अधिकारी, जनकल्याण समितीतील अनियमितता, मंत्री महोदयांच्या मिटींगला जनकल्याण समिती सदस्य उपस्थित नसले कारणाने चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. रुग्णांची गैरसोय, औषधोपचारातील दिरंगाई अथवा आरोग्य व्यवस्थेतील कोणताही हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. सर्व आरोग्य संस्थांनी रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पारदर्शक व तत्पर सेवा द्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande