बीड - शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंदडा कुटुंबीयांची संवेदनशील भूमिका
बीड, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। पावसाअभावी केज विधानसभा मतदारसंघातील केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवें
नमिता मुंदडा


बीड, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। पावसाअभावी केज विधानसभा मतदारसंघातील केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. सुरुवातीला पिकांची वाढ समाधानकारक असतानाच गेल्या काही काळापासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील पिकांवर संकट ओढवले आहे. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या असून, पिके सुकण्याच्या अवस्थेत असल्याचे आमदार नमिता यांनी पत्रात नमूद केले आहे.

पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. हीच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई तसेच पीकविमा लाभ मिळवून देण्याची मागणी आमदार नमिता यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संवेदनशील नेतृत्व

अंबाजोगाईशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी थेट शासनाच्या पातळीवर मांडल्याने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ चर्चेत न ठेवता त्यासाठी शासनाकडे अधिकृत पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande