
बीड, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। परळी वैजनाथ येथे लातूर येथील 250 सायकल स्वारा पैकी 35 सायकल स्वार आले. वैद्यनाथाच्या पायथ्याशी गती वैद्यनाथ जवळ सर्व सायकल स्वारांची पुष्प देऊन छायाचित्रकार संघटना परळीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर सर्वांचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व महाप्रसाद अनिल लाहोटी यांच्या वतीने या वारीतील सर्वांना आग्रहाने महाप्रसादासाठी पाचारण करण्यात आली. या ठिकाणी सर्वांनी महाप्रसादाचे लाभ घेऊन परळीकरांचे धन्यवाद मानून परतीचा प्रवास सुरू केला.
दरम्यान प्रतिवैद्यनाथ या ठिकाणी सर्वांना संघटना अध्यक्ष, सुनील फुलारी यांनी परळीच्या महात्म्याविषयी पुर्व प्रवेशद्वार व चैत्र गुढीपाडव्याला सूर्याची किरण थेट श्री वैद्यनाथ च्या पिंडीवर पडतात याची सखोल माहिती देऊन द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळीचे महत्त्व विशद केले. बारा ज्योतिर्लिंगापैकी हेच ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्पर्श दर्शन व माता-पार्वती सोबत असते. या माहिती नंतर हर हर महादेव वैजनाथ भगवान की जय जय घोष करून सर्वांनी आनंद व्यक्त करून आभार मानले.
यावेळी संघटना सचिव सोमनाथ वळसे, परळी क्रिकेट संघाचे कप्तान संतोष चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलराव झीलमेवाड , संजयराव चव्हाण, अनिल उदगीरकर ,सोमनाथ सोनटक्के व इतर छायाचित्रकार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis