अमरावती-मार्डी मार्गावरील बिबट्या अखेर जेरबंद; वनपालाच्या धाडसामुळे ग्रामस्थांना दिलासा
अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)पंधरा दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास मार्डी मार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनपालांनी स्वतः पिंजऱ्यात बसून त्याला पकडण्यात यश मिळविल्याची घटना मार्डी मार्गावर जलशुद्धीकरण
बिबट्याला पकडण्यासाठी वनपाल बसले पिंजऱ्यात


अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)पंधरा दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास मार्डी मार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनपालांनी स्वतः पिंजऱ्यात बसून त्याला पकडण्यात यश मिळविल्याची घटना मार्डी मार्गावर जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडली. बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पिंजऱ्यात बंदिस्त करून मेळघाटच्या जंगलात नेऊन सोडले. २२ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कारला व मार्डी येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पंधरा दिवसांपूर्वी मार्डी, कारला, राजुरा मार्गावर बिबट्याचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरी वस्तीपर्यंत, रहदारीच्या रस्त्यालगत बिबट्या येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे ही भीती अधिकच वाढली. त्यामुळे नागरिकांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करून बिबट्याला जेरबंद करून नागरिकांची सुरक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागान पिंजरा लावला. पण बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याचे बघून वनविभागाचे शूटर व वनपाल अमोल गावनेर हे स्वत: बिबट्यासाठी ठेवलेल्या पिंजऱ्यामध्ये टप्प्या टप्प्याने तीन दिवस सुमारे दहा तसांपर्यंत बसले व त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून होते.

अखेर बिबट्या शुक्रवारी पिंजऱ्याच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच टॅक्युलायझर गनने त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्यात आले, असे अमोल गावनेर यांनी सांगितले. मेळघाटात सोडलेल्या नर बिबट्याचे वय चार ते पाच वर्षे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगीतले.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande