
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कर्मचारी, शिक्षक प्रत्येकी दोन व एक प्राचार्य असे एकुण पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या पुरस्कारार्थीमध्ये उत्कृष्ट प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ - यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, उत्कृष्ट शिक्षक डॉ.रामकृष्ण हरिदास कदम - श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी (ता.उमरगा, जि.धाराशिव), महाविद्यालयीन कर्मचारी डॉ.दर्शना गांधी - जोशी - विद्यापीठ शिक्षक - डॉ.मच्छिद्र लांडे व विद्यापीठ कर्मचारी डॉ.अनिता पाटील यांचा गौरव करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त दोन महाविद्यालयांना दिवंगत शिक्षक आमदार वसंतराव काळे उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी शिवाजी महाविद्यालय -कन्नड व व्हीएसएस महाविद्यालय - जालना या दोन महाविद्यालयांची निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ.विजय भोसले व प्राचार्य डॉ.प्रसाद मदन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलं . यावेळी मार्च एप्रिल २०२६ परीक्षेतील १७ गुणवंतांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. संचालक डॉ बी एन डोळे यांनी पारितोषिकांचे वाचन केले. विद्यार्थी विकास मंडळातर्फे राजर्षी शाहू महाराज वक्तृत्व स्पर्धा तसेच अँटी रॅगिंग सप्ताह निमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात आले. या सर्वांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis