
जालना, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
शेलगाव, ता. बदनापूर येथील ऋषिकेश महेंद्र अंभोरे यांच्या बदनापुर येथे ‘आरुष डेअरी’ दूध संकलन प्रक्रिया केंद्राचे भव्य उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थित राहून अंभोरे-पाटील परिवाराशी संवाद साधत त्यांच्या या नव्या व्यवसाय उपक्रमाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला चालना देणारा आणि शेतकरी व पशुपालकांना निश्चितच लाभदायी ठरणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक दूध उत्पादकांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि ‘आरुष डेअरी’ दूध संकलन प्रक्रिया केंद्राची उत्तरोत्तर प्रगती व्हावी,असे त्यांनी सांगितले
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis