यवतमाळ - ४२ शाळांच्या संरक्षण भिंतींची कामे ठप्प
यवतमाळ, 23 ऑगस्ट (हिं.स.)जिल्ह्यातील तब्बल २४७ शाळांच्या संरक्षण भिंतींची कामे खनिज विकास निधी आणि रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आली होती. यातून आतापर्यंत ११३ कामे पूर्णत्वास आली असून, ४२ कामे सुरूच झाली नाही. यावरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे
४२ शाळांच्या संरक्षण भिंतींची कामे ठप्प


यवतमाळ, 23 ऑगस्ट (हिं.स.)जिल्ह्यातील तब्बल २४७ शाळांच्या संरक्षण भिंतींची कामे खनिज विकास निधी आणि रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आली होती. यातून आतापर्यंत ११३ कामे पूर्णत्वास आली असून, ४२ कामे सुरूच झाली नाही. यावरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणार्!या एका अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील तीन बालिकांचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. तर तिघींची प्रकृती चिंताजनक होती. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. सर्व आश्रम शाळाच नव्हेतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहे.

तरीसुद्धा जिल्हा परिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता गांभीर्य घेताना दिसून येत नाही. जिल्ह्यातील तब्बल २४७ शाळांना संरक्षण भिंत

नसल्याची बाब उघडकीस आली होती. दरम्यान, खनिज विकास निधी आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अभिसरणातून २४७ शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामांना मंजुरात देण्यात आली होती. तद्नंतर २३४ कामांना तांत्रिक मान्यतासुद्धा प्रदान करण्यात आली. यातून प्रत्यक्षात २०५ कामांना सुरवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता ही कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आजघडीस जिल्ह्यातील ११३ कामे पूर्णत्वास आले आहे. परंतु ४२ कामे अद्यापही सुरू होऊ शकली नाही. यावरून विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र निधी मंजूर असल्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनच निरुत्साही असल्यामुळे कामांना मुहूर्त मिळू शकला नाही. याबाबत आता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी काय पावले उचलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खनिज विकास निधी आणि रोहयोअंतर्गत अभिसरणातून ही कामे केली जाणार होती. मात्र, मध्यंतरी रोजगार हमी योजना नव्या स्वरूपात विकसित भारत रोजगार व आजीविकास हमी मिशन नावाने कार्यान्वित करण्यात आली आहे. तत्पूर्वीच प्रशासनाने ४३ कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विविध तांत्रिक कारणांचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे.

---------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande