अमरावती : डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन
अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)। डोमा येथील आश्रमशाळेत घडलेल्या भूतबाधेच्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काळे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात
डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन


अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.)। डोमा येथील आश्रमशाळेत घडलेल्या भूतबाधेच्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काळे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना धीर देत त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आमदारांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. शाळेतील वातावरणाबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांकडूनही माहिती घेण्यात आली. तसेच महर्षी शाळेत मृत्यू पावलेल्या स्व. राजेश बेठेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करण्यात आली.

दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना आधार देत त्यांना मदत करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष आलोक अलोकर, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, श्रीराम आठवले, शैलेश म्हाला, नितीन चावरे, अभिषेक राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक आधार यांना प्राधान्य देत, त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी आमदार केवलराम काळे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande