डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा वर्धापनदिन संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवारी (दि.२३) करण्यात आले. या सोहळयासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगर
Q


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवारी (दि.२३) करण्यात आले. या सोहळयासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगरु डॉ. संजीव सोनवणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्त ध्वजारोहण, जीवन साधना पुरस्कार वितरण, गुणवंताना पारितोषिक वितरण आदी कार्यक्रम झाले.

कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी अध्यस्थान भूषविले. यावेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी भास्कर मुंढे, प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी विभागीय आयुक्त भास्कर शंकरराव मुंढे यांना जीवनसाधना पुरस्कार, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या ६८ वर्षांच्या प्रगतीचा आढावा प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी प्रास्ताविकातून घेतला. यावेळी विविध पारितोषिक, पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यापूर्वी मुख्य प्रशासकीय ईमारतीसमोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ.विजय फुुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकाविण्यात आला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande