लातूर–लामजना महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; प्रोत्साहन अनुदानाची मागणी
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर–लामजना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, शासनाच्या धोरणांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. नियमितपण
आंदोलन


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर–लामजना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, शासनाच्या धोरणांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. आंदोलनामुळे लातूर–लामजना महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande