
परभणी, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
पूर्णा तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. २४) सकाळी ११.३० वाजता तालुका क्रीडा संकुल, पूर्णा येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते संकुलाचे लोकार्पण होणार आहे.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, नगराध्यक्ष विमलबाई कदम, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव, आ. सईद खान शेरगुल खान, आमदार डॉ. राहुल पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संकुलामुळे पूर्णा तालुक्यातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis