देशाच्या उभारणीत पत्रकारांचे मोठे योगदान : आ.संजय बनसोडे
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत आहेत. पत्रकार
संजय बनसोडे


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत आहेत. पत्रकारांच्या व त्यांच्या पाल्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे कारण पत्रकारांचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार संजय बनसोडे यांनी केले.

ते संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई शाखा उदगीरच्या वतीने आयोजीत पत्रकार व पत्रकार पाल्यांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, प्रसिध्द निवेदक विलास बडे, गोविंद वाकडे, तहसिलदार राम बोरगावकर, गणेश गायकवाड, जि.प. चे समाजकल्याण सभापती उत्तम माने, जि.प. चे बांधकाम असभापती ज्ञानेश्वर बिरादार, रामराव राठोड, पो.नि. दिलीप गाडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार तसेच वंचित घटकांचे प्रश्न प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. पत्रकारिता करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो; मात्र सामाजिक बांधिलकी जपुन पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात.

पत्रकारांच्या पाल्यांनीही शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार पाल्यांचा सन्मान हा केवळ विद्यार्थ्यांचा गौरव नसून त्यांच्या पालकांच्या मेहनतीचा आणि संस्कारांचा गौरव आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते, असेही आ.संजय बनसोडे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande