ज्ञानभूमीने घडविले अनेकांचे जीवन : डॉ.सोनवणे
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या या विद्यापीठाच्या ज्ञानभूमीने खेडयापाडयातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे समग्र जीवन घडविले. माझ्या सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याल
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या या विद्यापीठाच्या ज्ञानभूमीने खेडयापाडयातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे समग्र जीवन घडविले. माझ्या सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला कुलगुरुपदी पोहाचेविल्या बद्दल विद्यापीठाविषयीची कृतज्ञता कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे यांनी व्यक्त केली. ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्यात शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान असून देशाला महासत्ता करण्यासाठी सर्वांनी मिळून नेटाने प्रयत्न करावेत, असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कर्तव्यनिष्ठेने काम करणारा प्रत्येकजण श्रेष्ठ : भास्कर मुंढे

डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी असो की राजकारणी कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते. तर कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करुन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारी प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठच असते, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचा विद्यार्थी ते प्रभारी कुलगरु आणि ज्ञानसाधना पुरस्कारार्थी या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी फ्लॅशबॅक पध्दतीने घेतला. अंबाजोगाईतून त्यावेळच्या औरंगाबादला (आजचे छत्रपती संभाजीनगर) येताना अंधारातून प्रकाशाकडे नेणा-या गाडीतून प्रवास झाल्याची भावना होती. तर खेडयापाड्यातील सर्वसामान्य माणसांच्या सहकार्याने प्रशासनात खूप काही करता आले, असेही ते म्हणाले.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. गेल्या ६८ वर्षात विद्यापीठाने प्रगतीची अनेक शिखरे गाठली असे सांगितले. 'नॅक' ’ए प्लस’ मानाकंन प्राप्त असलेले आणि ’फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स’ घडविणारे आपले विद्यापीठ आहे. अत्यंत कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही कुलगुरु म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande