नगरपालिकेच्या शाळांतून घडतील जबाबदार व संस्कारक्षम नागरिक - ॲड. राहुल नार्वेकर
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। नगरपालिकेच्या शाळांमधून उद्याचे जबाबदार, संस्कारक्षम आणि गुणवंत नागरिक घडतील. गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी हक्काची शाळा मिळावी, यासाठी नगरपालिकेच्या शाळांचा कायापालट करण्याची गरज आहे. शिक्षकांनी
school


सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। नगरपालिकेच्या शाळांमधून उद्याचे जबाबदार, संस्कारक्षम आणि गुणवंत नागरिक घडतील. गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी हक्काची शाळा मिळावी, यासाठी नगरपालिकेच्या शाळांचा कायापालट करण्याची गरज आहे. शिक्षकांनी उत्तम संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शाळांची गुणवत्ता वाढविल्यास शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५च्या नूतन इमारतीचे उद्घाटन ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, उपनगराध्यक्ष येताळ भगत, सार्वजनिक बांधकाम सभापती गौरीशंकर गुरुकुल, तहसीलदार मदन जाधव, मुख्याधिकारी सुरेश भदर, नगर अभियंता प्रशांत सोनटक्के यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नार्वेकर म्हणाले, या शाळेची देखणी व सुंदर इमारत उभी राहिली असून विशेष म्हणजे या शाळेचा कायापालट करणारे आमदार समाधान अवताडे हे याच शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले आणि ज्या शिक्षकांनी त्यांना घडविले, त्या शिक्षकांचा या समारंभात सन्मान होणे ही कौतुकाची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande