
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। किल्ले धारूर आगाराच्या ताफ्यात आजपासून ५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. ५६ प्रवासी आसनक्षमता असलेल्या या बसेसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन ‘पॅनिक बटण’ची सुविधा आहे. दरम्यान, धारूरच्या नव्या बसस्थानकाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक बसस्थानक उभारण्याची तयारी सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, प्रस्तावित बसस्थानकात शॉपिंग कॉम्प्लेक्स, मिनी थिएटरसह आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis