मनमाड नगरपरीषदेचा सोमवारी ठरणार उपनराध्यक्ष
मनमाड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। मनमाड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी विशेष सभा आज सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील नगरविकास शाखेने याबाबत अधिकृत नोटीस जारी केली आहे
मनमाड नगरपरीषदेचा सोमवारी ठरणार उपनराध्यक्ष


मनमाड, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

मनमाड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी विशेष सभा आज सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील नगरविकास शाखेने याबाबत अधिकृत नोटीस जारी केली आहे. मनमाड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मुकुंद गौतम एलिंजे यांनी दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नगराध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील संबंधित तरतुदींनुसार रिक्त पदासाठी विशेष सभा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार, नांदगाव यांना अनुसूचीप्रमाणे पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत मनमाडच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष सभेत नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार असून, नव्या उपाध्यक्षाच्या निवडीकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande