बीड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या पाहणीसाठी नगराध्यक्षा पारवे मैदानात
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। बीड शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा पारवे यांनी इस्लामपुरा ईदगाह आणि ईट येथील जलशुद्धीकरण केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष सभेतील निर्णयानुसार दोन्ही केंद्रांवरील नादुरुस्त यंत्रसामग्री,
बीड नगराध्यक्षा


बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। बीड शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा पारवे यांनी इस्लामपुरा ईदगाह आणि ईट येथील जलशुद्धीकरण केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष सभेतील निर्णयानुसार दोन्ही केंद्रांवरील नादुरुस्त यंत्रसामग्री, पंप, फिल्टर सॅन्ड, विद्युत पॅनलसह आवश्यक उपकरणे तातडीने बदलून कामाला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नागरिकांना अखंड, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी सर्व कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande