
नांदेड, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेडचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी जानापुरी गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष पाहणी केली.
मतदारसंघातील जानापुरी येथे स्मशानभूमी तसेच रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या.
गावकऱ्यांची गरज लक्षात घेऊन लवकरात लवकर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्याच्या कामाबाबतही आवश्यक ती कार्यवाही करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधा आणि विकासाला सदैव प्राधान्य देणार असल्याचे आमदार बोंढारकर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis