
कोल्हापूर, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जनसंवाद कार्यक्रमात सुमारे हजारांहून अधिक नागरिकांची निवेदने चेहऱ्यावर कोणताही त्रागा न करता अत्यंत नम्रतापूर्वक स्वीकारली. तसेच या निवेदनाच्या अनुषंगाने नागरिकांना आश्वासक शब्दात दिलासा दिला. प्रत्येकच्या प्रकरणांबाबत स्पष्ट वस्तुस्थिती कथन करणे आदी बाबी पार पाडल्या.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात आज रविवार असूनही दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हजारो नागरिकांच्या उपस्थितीने गजबजला होता.
दुपारी चारच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. नागरिकांच्या या गर्दीला दिलासा देण्याचे काम मंत्री बावनकुळे यांच्यामार्फत झाले. जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही अशा शब्दात मंत्री बावनकुळे यांचा नागरिकांना दिलासा दिला.
यावेळेस आ. अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, डॉ समीर शिंगटे यांच्यासह महसुल भागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar