युवकांनी कायद्याचे भान ठेवून अंमली पदार्थ व रॅगिंगपासून दूर राहावे - न्या. अमोलकुमार देशपांडे
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। युवकांनी कायद्याची माहिती आत्मसात करून अमली पदार्थांचे सेवन आणि रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांपासून दूर राहावे. तसेच बालकांच्या संरक्षणाबाबत संवेदनशील राहून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका ब
युवकांनी कायद्याचे भान ठेवून अंमली पदार्थ व रॅगिंगपासून दूर राहावे - न्या. अमोलकुमार देशपांडे


सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। युवकांनी कायद्याची माहिती आत्मसात करून अमली पदार्थांचे सेवन आणि रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांपासून दूर राहावे. तसेच बालकांच्या संरक्षणाबाबत संवेदनशील राहून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावावी, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पॉक्सो कायदा, अमली पदार्थ प्रतिबंध आणि रॅगिंगसंदर्भातील कायद्यांबाबत विधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी देशपांडे मार्गदर्शन करत होते.सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. परमानंद जवळकोटे यांनी पॉक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदी, बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता अमली पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande