
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑगस्ट (हिं.स.)।
श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान, श्री क्षेत्र शिऊर फडाचा ४७ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह यंदा परसोडा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी या निमित्ताने भेट दिली. आमदार बोरणारे हे त्यांच्यासोबत होते .विचारांचा, हरिनामाचा आणि भक्ती-परंपरेचा जागर घडविणाऱ्या या पवित्र सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. अखंड हरिनाम, कीर्तन, प्रवचन आणि संतविचारांच्या माध्यमातून समाजात श्रद्धा, संस्कार, एकोपा आणि अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis