म. जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रम राबविले जाणार - भुजबळ
अ. भा. महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये संपन्न बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)। देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्वात अगोदर अखिल भा
Social activities will be


Social activities will be


अ. भा. महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये संपन्न

बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव

नाशिक, 23 ऑगस्ट (हिं.स.)। देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्वात अगोदर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठविला. आंदोलने, मोर्चे काढण्यात आले निवेदने देण्यात आली. तसेच समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. आज आपल्या या लढ्याला मोठ यश मिळाले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ.कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे,ॲड.राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे,ॲड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ.नागेश गवळी, डॉ.स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे ,सुनिल मेटे, प्मंजिरी धाडगे, माया इरतकर,प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रविंद्र खरात,यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० कलमात ओबीसी घटकासाठी तरतूद केली आहे. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिला व बहुजन समाजाला शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजात विरोध पत्करून आयुष्यभर लढा दिला. महात्मा फुले यांनी जे कार्य केले. जे विचार मांडले ते कायद्यात मांडण्याचे काम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तर वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आहे.आज आरक्षण मिळाल्यामुळे समाजातील वंचित घटकातील मुले शिक्षित होऊन आज मोठ्या पदावर पोहचली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषांचे विचार प्रत्येक जिल्ह्यात रुजविण्याचे काम समता सैनिकांनी करावे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह समाज सुधारकांना आपल्या कार्यकाळात काम करत असताना अनेक कर्मठ लोकांनी विरोध केला त्रास दिला. त्या पद्धतीचे काही लोक आजही समाजात अजून समाजविघातक काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या विघातक शक्तींना आपण हाणून पाडले पाहिजे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, समाजातील जे वंचित घटक आहे. जो अडलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रत्येक समता सैनिकाने अविरतपणे केले पाहिजे.देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्वात अगोदर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठविला. आंदोलने, मोर्चे काढण्यात आले निवेदने देण्यात आली. तसेच समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. आज आपल्या या लढ्याला मोठ यश मिळाले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते राज्यभरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

*बैठकीत हे झाले ठराव....*

जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव....

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande