श्रावणी द्वितीय सोमवार निमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात राहणार कडेकोट पोलीस बंदोबस्त
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। 300 पेक्षा अधिक पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा करणार काम पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. उद्या
श्रावणी सोमवार


बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

300 पेक्षा अधिक पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा करणार काम

पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. उद्या दिनांक २४ रोजी श्रावणातील द्वितीय श्रावणी सोमवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या देखरेखीखाली मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तब्बल २७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी आणि एसआरपीएफ जवानांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन, दर्शन रांगा, वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande