नाथ महाराजांचे 14 वे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली सांगता
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान येथे रविवार 16 ऑगस्ट पासुन अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा तथा श्रीमद भागवत कथा सुरू असून हभप हरिहरजी महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतुन सुरू
धनंजय मुंडे


बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान येथे रविवार 16 ऑगस्ट पासुन अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा तथा श्रीमद भागवत कथा सुरू असून हभप हरिहरजी महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतुन सुरू असलेल्या भागवत कथेची सांगता झाली. रविवारी 23 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत संत एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज असलेले हभप योगीराज महाराज गोसावी यांचे काल्याचे किर्तन झाले. या किर्तनास व महाप्रसादास हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान येथे सुमारे 750 वर्षापूर्वी महानसंत जगमित्रनागा महाराज यांना साक्षात विठ्ठल पांडुरंगाने वाघाच्या रुपात दर्शन दिले होते,अशा धार्मिक दृष्ट्या पावन व पवित्र ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळयाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 01 वा श्री संत एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. किर्तनास व महाप्रसादास भाविकभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande