बारामतीत रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा बारामतीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले न
बारामतीत रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू


पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा बारामतीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. दरम्यान, रविवारी सकाळी घराजवळच मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुई परिसरातील साई गणेश नगर येथे फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी आणि आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा घातपात आहे की अन्य कारणामुळे मृत्यू झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande