विकासकामांना गती, गावांच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न - आ. आनंद बोंढारकर
नांदेड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। विकासकामांना गती, गावांच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी चा प्रयत्न असून गावकऱ्यांच्या माध्यमातून गावाचा विकास केला जाईल अशी माहिती शिवसेनेचे नांदेडचे आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले. मतदारसंघातील आंबेसांगवी येथे प्
अ


नांदेड, 23 ऑगस्ट (हिं.स.)।

विकासकामांना गती, गावांच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी चा प्रयत्न असून गावकऱ्यांच्या माध्यमातून गावाचा विकास केला जाईल अशी माहिती शिवसेनेचे नांदेडचे आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले.

मतदारसंघातील आंबेसांगवी येथे प्राचीन दत्त मंदिराच्या सभागृहाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद शाळेसह गावातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. गावातील विविध समस्या, शैक्षणिक सुविधा तसेच आवश्यक विकासकामांबाबत नागरिकांकडून माहिती जाणून घेतली.

आंबेसांगवी गावातील प्रलंबित विकासकामांसाठी लवकरात लवकर आवश्यक निधी उपलब्ध करून देत ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.गावागावातील मूलभूत सुविधा सक्षम करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande