
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात सर्वपक्षीय नेते, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.गणेशोत्सव आणि दहीहंडीवर अनावश्यक निर्बंध लादू नयेत, अशी भूमिका बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना मोकळे वातावरण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.बैठकीत गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या आयोजनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांची निर्बंधमुक्त उत्सवाची मागणी आणि पोलिस प्रशासनाने केलेले नियमपालनाचे आवाहन यामुळे आगामी उत्सवाच्या नियोजनाला महत्त्व आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु