पुणे महापालिका शाळांतील ‘पिंक रूम’ कागदावरच; ७५ शाळांमधील विद्यार्थिनी सुविधेच्या प्रतिक्षेत
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या शाळांमधील मुलींसाठी स्वतंत्र ‘पिंक रूम’ उभारण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी या सुविधेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. २०२६-२७च्या महापालिका अंदाजपत्रकात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला
PMC news


पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या शाळांमधील मुलींसाठी स्वतंत्र ‘पिंक रूम’ उभारण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी या सुविधेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. २०२६-२७च्या महापालिका अंदाजपत्रकात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, विविध विभागांमध्ये समन्वयाअभावी योजना प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.महापालिकेच्या ‘विद्यावर्धिनी’ प्रकल्पांतर्गत शहरातील ७५ शाळांमध्ये पिंक रूम उभारण्याचे नियोजन आहे.

यासाठी आवश्यक साचा बांधकाम विभागाकडून तयार केला जाणार असून, रूमसाठी लागणारे साहित्य आयटी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.मुलींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, हा पिंक रूममागील मुख्य उद्देश आहे. वयात येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही सुविधा महत्त्वाची असतानाही तिच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande